Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra 2024 – पात्रता, कागदपत्रे, ऑनलाईन फॉर्म

मित्रांनो आता राज्यातील महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये मिळणार आहेत, एक मोठी अभिनव अशी महिला कल्याणकारी योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे. मध्यप्रदेश च्या धर्तीवर आता महाराष्ट्रात देखील Majhi Ladki Bahin Yojana सुरू करण्यात आली आहे. त्यासंबंधी अधिकृत घोषणा (अपडेट) देखील जारी करण्यात आली आहे.

लाडकी बहिण योजना साठी कोणत्या महिला पात्र असणार? कोणत्या अपात्र असणार? अर्ज केव्हा सुरू होणार? ऑनलाईन अर्ज कसा करायचा? अर्जाची शेवटची तारीख कोणती? पैसे कसे मिळणार & कधी मिळणार? हप्ते केव्हा येणार? अशी सर्व महत्वाची माहिती या लेखामध्ये मी दिली आहे, त्यामुळे महत्वाची माहिती आहे काळजीपूर्वक वाचून घ्या.

अजून एक नवीन महत्वाची अपडेट आली आहे, त्यानुसार आता लाडकी बहीण योजना साठी अर्ज करण्याची तारीख वाढवण्यात आली आहे. शासनाने 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ जाहीर केली आहे.

Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra 2024

दिनांक 27 जून 2024 रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला होता, त्या दरम्यान राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू करण्यासंबंधी अधिकृत घोषणा केली होती.

त्यानुसार लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे 28 जून 2024 रोजी Ladki Bahin Yojana ची अंमलबजावणी करण्यासाठी अधिकृत GR देखील शासनाने पारित केला. त्यानुसार आता माझी लाडकी बहिण योजनेसंबंधी अधिकृत माहिती उपलब्ध झाली आहे.

लाडकी बहीण योजनेची शॉर्ट माहिती

Mukhymantri Mazi Ladki Bahin Yojana GR

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय GR प्रसिद्ध केला आहे, त्यानुसार आता या नव्या Ladki Bahin Yojana ची अंमलबजावणी राज्यात करण्यात आली आहे.

शासनाने योजने संबंधी सर्व निकष आणि अटी या GR मध्ये सांगितल्या आहेत, त्यानुसार केवळ पात्र अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

GR मध्ये लाडकी बहिण योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली आहे, सोबत कोणत्या महिला पात्र असणार? कोणत्या नसणार? अर्ज कसा करायचा? याची पूर्ण माहिती देण्यात आली आहे.

जर तुम्हाला Ladki Bahin Yojana GR वाचायचा असेल, तर खाली दिलेल्या बटण वर क्लिक करून शासन निर्णय PDF स्वरुपात डाउनलोड करा आणि GR वाचून घ्या.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना पात्रता निकष

लाडकी बहिण योजना साठी महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 वर्षे वयाच्या महिला अर्ज करू शकणार आहेत. मात्र अर्ज करणाऱ्या महिला या विवाहित, विधवा, घटस्फोटित किंवा निराधार असणे आवश्यक आहे.

Ladki Bahin Yojana Eligibility

अर्जदार महिलांसाठी पात्रता अटी

  • अर्ज करणाऱ्या महिला या महाराष्ट्र राज्याच्या कायमस्वरूपी रहिवासी असाव्यात.
  • महिलांचे वय हे 21 ते 65 वर्षा पर्यंत असावे.
  • महिलांचे लग्न झालेले असावे.
  • महिला या विवाहित, विधवा, घटस्फोटित किंवा निराधार असाव्यात.
  • लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे रू. 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.

जर वरील निकषात महिला येत असेल, तर त्या महिलेला Ladki Bahin Yojana साठी अर्ज करता येणार आहे.

योजनेच्या अटी आणि शर्ती

  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे रू. 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.
  • कुटुंबातील कोणी पण आयकर Income Tax भरणार नसावा.
  • कुटुंबातील कोणालाही सरकारी नसावी.
  • अर्जदार महिलेने शासनाच्या इतर योजनेचा लाभ घेतलेला नसावा. (रू. 1,500 पेक्षा जास्त लाभ)
  • कुटुंबातील कोणी पण आमदार, खासदार किंवा राजकारणाशी संबंधित नसावा.
  • कुटुंबाच्या नावे 5 एकर पेक्षा जास्त शेतजमीन/ जमीन नसावी. 2 हेक्टर पेक्षा जास्त जमीन असलेल्या कुटुंबातील महिलांना लाभ मिळणार नाही.
  • कुटुंबातील कोणाच्याही नावे चारचाकी वाहन (कार, बोलेरो) नसावी. (ट्रॅक्टर वगळून)

लाडकी बहिण योजने संबंधित पात्रता आणि अपात्रता अटी या वरील प्रमाणे असणार आहेत, या अटी शर्ती मध्ये शासन पुढे सुधारणा देखील करू शकते. तशी नोंद GR मध्ये करण्यात आली आहे.

लाडकी बहीण योजना साठी आवश्यक कागदपत्रे

  • महिलेचे आधार कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला / मतदान कार्ड / रेशन कार्ड (15 वर्षा पूर्वीचे केशरी किंवा पिवळे)
  • उत्पन्न प्रमाणपत्र / केशरी किंवा पिवळे रेशनकार्ड
  • हमीपत्र (शपथपत्र)
  • बँक पासबुक

Ladki Bahin Yojana Important Dates

अर्ज सुरू होण्याची तारीख०१ जुलै २०२४
अर्जाची शेवटची तारीख३१ ऑगस्ट २०२४
३१ ऑगस्ट २०२४ हि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे, पण ३१ ऑगस्ट रोजी पण फॉर्म भरला तरी महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे पैसे एकदाच मिळणार आहेत.  

Ladki Bahin Yojana Important Links

Official Websiteअद्याप पोर्टल सुरु झाले नाही
ऑनलाईन अर्जApply Online Now
योजनेचा GRशासन निर्णय वाचा

Mazi Ladki Bahin Yojana Online Apply

माझी लाडकी बहीण योजना साठी अर्जदार महिलांना ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करता येणार आहेत. अर्ज सुरू झाले आहेत, त्यासाठी तुम्हाला अर्जाची Online Apply Link सोबत Online Form कसा भरायचा? याची स्टेप बाय स्टेप माहिती देखील खाली देण्यात आली आहे.

योजनेची कार्यपद्धती –

अर्ज करण्याची प्रक्रिया:

माझी लाडकी बहीण योजना साठी ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही माध्यमातून अर्ज सुरू करण्यात आले आहेत. तुम्हाला ज्या पद्धतीने अर्ज करायचा आहे, त्याप्रकारे तुम्ही अर्ज करू शकणार आहात.

टीप: तुमच्या जवळील सेतू सुविधा केंद्रात जाऊन ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरून घ्या, फॉर्म हा फ्री मध्ये भरला जाणार आहे. फक्त Documents

Mazi Ladki Bahin Yojana Application Form Process

ऑनलाईन स्वरूपात –

ऑनलाईन स्वरूपात माझी लाडकी बहीण योजना साठी अर्जदार महिलांना योजनेच्या पोर्टलवर, ॲपवर, किंवा सेतू सुविधा केंद्रात जावे लागणार आहे.

  1. जवळच्या कोणत्याही सेतू सुविधा केंद्राला भेट द्या.
  2. तेथील केंद्र चालकाला Mazi Ladki Bahin Yojana Form भरण्यासाठी विचारणा करा.
  3. केंद्र चालकाकडे आवश्यक असे सर्व कागदपत्रे सुपूर्द करा.
  4. त्यानंतर केंद्र चालक तुमचा फॉर्म भरून तुम्हाला त्याची पावती देईल, आणि त्यानंतर फॉर्म भरण्याचे चार्जेस घेईल. (फक्त रू. 100 द्या, जास्त देऊ नका)
  5. पावती मिळाल्यानंतर तुमचा लाडकी बहीण योजना चा अर्ज ऑनलाईन स्वरूपात सबमिट होऊन जाईल.

ऑफलाईन स्वरूपात –

जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येत नसेल, तर काळजी करू नका ऑफलाईन अर्जाची सुविधा पण देण्यात आली आहे. ऑफलाईन अर्ज कसा करायचा? याची माहिती खालीलप्रमाणे आहे.

  • लाडकी बहीण योजना चा फॉर्म ऑफलाईन स्वरूपात भरण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळील अंगणवाडी केंद्रात जायचे आहे.
  • तेथे योजनेसाठी लागणारे सर्व कागदपत्रे सादर करायचे आहेत, नंतर अर्ज भरल्यावर त्याची पोच पावती जवळ ठेवायची आहे.

अर्ज भरताना करायची प्रोसेस –

  • योजनेसाठी अर्ज सादर करताना अर्जदार महिलेला त्याठिकाणी उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
  • अर्ज भरताना महिलेचा Live फोटो काढला जाणार आहे, आणि सोबत KYC देखील करावी लागणार आहे.

Mazi Ladki Bahin Yojana निवड प्रक्रिया

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसाठी ज्या महिलांनी अर्ज केला आहे, त्यांची निवड ही कार्यक्षेत्रानुसार केली जाणार आहे. ग्रामीण आणि नागरी असे दोन विभाग असणार आहेत.

कार्यक्षेत्रप्रत्यक्ष फॉर्म भरणेअर्ज पडताळणी अंतिम मंजुरी
ग्रामीण विभागअंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका/ सेतू सुविधा केंद्र/ ग्रामपंचायत/ ग्रामसेवकसंबंधित जिल्ह्याच्या महिला व बाल विकास अधिकारीजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षेतील समिती
नागरी विभागअंगणवाडी सेविका/ मुख्य सेविका/ वार्ड अधिकारी/ सेतू सुविधा केंद्रसंबंधित जिल्ह्याच्या महिला व बाल विकास अधिकारीजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षेतील समिती

Mazi Ladki Bahin Yojana Yadi (List)

माझी लाडकी बहीण योजना साठी ज्यांनी सुरुवातीला 1 जुलै ते 31 ऑगस्ट दरम्यान अर्ज केला आहे, त्यांची सुरुवातीला तात्पुरती यादी प्रकाशित केली जाणार आहे. नंतर पाच दिवस हरकत, तक्रार साठी वेळ दिला जाईल नंतर त्यावरून अंतिम यादी प्रकाशित केली जाणार आहे.

Final List यादी तुम्ही अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत, सेतू सुविधा केंद्र, योजनेचे पोर्टल आणि ॲपवर पाहू शकणार आहात. अंतिम यादी मध्ये पात्र आणि अपात्र असे दोन वर्ग असणार आहेत, यांची स्वतंत्र यादी जारी केली जाणार आहे.

टीप: पात्र यादीत नाव आलेल्या महिलेचे आकस्मिक निधन झाले तर त्यांचे नाव यादीतून वगळण्यात येणार आहे.

Ladki Bahin Yojana Installments

लाडकी बहीण योजनेचे पैसे हे Installment हप्त्याच्या स्वरूपात पात्र महिलांना दिले जाणार आहात. दर महिन्याच्या 15 तारखे पर्यंत लाभार्थी महिलेच्या बँक (आधार लिंक असलेल्या) खात्यावर DBT द्वारे थेट पैसे जमा केले जाणार आहेत.

पहिला हप्ता15 ऑक्टोबर 2024
दुसरा हप्ता15 नोव्हेंबर 2024
तिसरा हप्ता15 डिसेंबर 2024
चौथा हप्ता15 जानेवारी 2025
पाचवा हप्ता15 फेब्रूवारी 2025

वरील Serial नुसार प्रत्येक महिन्याला राज्यातील महिलांना रू. 1,500 दिले जाणार आहेत. दर महिन्याच्या 15 तारखेपर्यंत पैसे जमा केले जातील, 15 तारखेनंतर लाभार्थी महिला या AEPS द्वारे (आधार कार्ड वरून) किंवा बँकेत जाऊन पैसे काढू शकणार आहेत.

Ladki Bahin Yojana FAQ

माझी लाडकी बहिण योजना साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?

माझी लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांना किती रुपये मिळणार?

माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कोठून करायचा?

माझी लाडकी बहीण योजनेचे अधिकृत पोर्टल कोणते?

माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता केव्हा जाहीर होणार?

माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे कधी मिळणार?

Scroll to Top