लाडकी बहीण योजना हमीपत्र PDF Download | Ladki Bahin Yojana Hamipatra PDF Download

Ladki Bahin Yojana Hamipatra PDF Download

Ladki Bahin Yojana Hamipatra PDF Download: मित्रांनो महाराष्ट्र शासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहिणी योजनेसाठी हमीपत्र लागत आहे, हमीपत्र शिवाय लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरता येत नाहीये.

जर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी नवीन फॉर्म भरत असाल तर तुम्हाला हमीपत्र फॉर्म सोबत अपलोड करणे अनिवार्य आहे.

या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला Ladki Bahin Yojana Hamipatra PDF Download करण्यासाठी लिंक दिली आहे. तुम्ही या डायरेक्ट लिंक वर क्लिक करून ladki bahin yojana हमीपत्र pdf download करू शकता.

सोबतच हमीपत्र कसं भरायचं? हमीपत्र मध्ये कोणकोणत्या बाबी नमूद केल्या आहेत? ही सर्व माहिती पण आर्टिकल मध्ये मी सांगितली आहे.

महत्त्वाची अशी माहिती आहे तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेच्या हमीपत्र डाऊनलोड करायचे असेल तर आर्टिकल काळजीपूर्वक वाचा.

Ladki Bahini Yojana Hamipatra PDF Download

लाडकी बहीण योजनेसाठी हमीपत्र डाऊनलोड करताना काही महत्त्वाच्या बाबी तुम्हाला लक्षात ठेवणे आवश्यक आहे. या सर्व बाबी मी खाली समाविष्ट केल्या आहेत, जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा अर्ज सादर करताना कोणत्याही स्वरूपाची अडचण येणार नाही.

  • हमीपत्र फॉर्म वर तुम्हाला जी माहिती विचारली आहे ती माहिती काळजीपूर्वक टाका.
  • माहिती अचूक भरा, अर्जदाराचे सही आणि नाव बरोबर टाका.
  • तुमच्या गावाचे किंवा तालुक्याचे नाव स्थळ या ठिकाणी टाका.
  • दिनांक मध्ये ज्या तारखेला तुम्ही फॉर्म भरत आहात ती तारीख टाका.

Ladki Bahin Yojana Hamipatra Download Link

लडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या हमीपत्राची Downlod link खाली दिली आहे, तुम्ही या लिंक वर क्लिक करून डायरेक्ट हमीपत्र pdf download करू शकता.

हमीपत्र PDF येथुन Download करा

Arjdarache Hamipatra Mahnje kay

अर्जदाराचे हमीपत्र म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या सर्व अटी अर्जदाराला मान्य आहेत, त्यासाठी शासन Arjdarache Hamipatra मागवत आहे.

हमीपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे, ज्या महिलांनी ladki bahin yojna hamipatra फॉर्म सोबत जोडले नसेल किंवा चुकीने दुसरेच डॉक्युमेंट अपलोड केले असेल त्यांचा अर्ज रेजेक्ट करण्यात येतो.

त्यामुळे एक वेळ बँक खाते पासबुक चुकले तरी चालेल पण hamipatr चुकू द्यायचे नाही. हमीपत्र हे सर्वात महत्वाचे डॉक्युमेंट आहे, त्यावरच महिलांना Approval भेटत आहे, त्यामुळे इतरांनी जी चूक केली आहे, ती तुम्ही करू नका.

How to Download Ladki Bahin Yojana Hamipatra PDF Download

जर तुम्हाला अधिकृत संकेतस्थळावरून हमीपत्र डाऊनलोड करायचे असेल तर खाली दिलेल्या स्टेप फॉलो करा आणि त्या प्रकारे Ladki Bahin Yojana Hamipatra PDF Download करा.

  • सुरुवातीला तुम्हाला नारीशक्ती ॲप डाऊनलोड करायचा आहे.
  • तिथे तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर ने लॉगिन करून घ्यायचा आहे.
  • त्यानंतर होम पेजवर आल्यावर तेथे तुम्हाला महिलांच्या योजना त्या लिंक वर क्लिक करायचं आहे.
  • लिंक वर क्लिक केल्यावर हमीपत्र PDF डाउनलोड करा या लिंक वर क्लिक करायचे आहे.
  • थोडा वेळ वेट करा, डाऊनलोड करत आहे असा मेसेज येईल.
  • त्यानंतर तुमच्या मोबाईलवर Ladki Bahin Yojana Hamipatra Download होईल.

डाउनलोड झालेले हमीपत्र तुम्ही तुमच्या नवीन फॉर्मसाठी वापरू शकता, यासाठी तुम्हाला डाऊनलोड करण्यात आलेल्या pdf ची प्रिंट आऊट काढून घ्यावी लागेल. प्रिंट काढल्यानंतर जसे या आर्टिकल मध्ये सांगितलं आहे त्या प्रकारे arjdarache hamipatra भरून ते तुम्ही लाडकी बहीण योजना ऑनलाईन फॉर्म सोबत जोडू शकता.

Ladki Bahin Yojana Hamipatra Namuna

लाडकी बहिण योजनेचे हमीपत्र कशाप्रकारे भरले जाते, याचा नमुना खाली दिला आहे. त्याच प्रकारे तुम्हाला Ladki Bahin Yojana Hamipatra भरून फॉर्म सोबत अपलोड करायचे आहे.

Ladki Bahin Yojana Hamipatra Namuna Image

How to fill Ladki Bahin Yojana Hamipatra?

लाडकी बहीण योजनेचे हमीपत्र डाऊनलोड केल्यावर, त्याची तुम्हाला प्रिंटआउट काढून घ्यायची आहे. प्रिंट काढल्यानंतर हमी पत्रात खालील प्रमाणे माहिती भरायची आहे.

  • सर्वात पहिल्यांदा तुम्हाला ज्या अटी दिल्या आहेत, त्या अटी समोर राईट टिक करायचा आहे.
  • त्यानंतर खाली तुम्हाला उजव्या बाजूला अर्जदाराची सही घ्यायची आहे.
  • सही सोबतच अर्जदाराचे संपूर्ण नाव खाली टाकायचे आहे.
  • त्यानंतर डाव्या बाजूला ज्या ठिकाणाहून तुम्ही अर्ज सादर करताय त्या ठिकाणाचे नाव टाकायचे आहे.
  • पुढे तुम्हाला खाली दिनांक टाकायचा आहे, ज्या दिवशी तुम्ही अर्ज करताय त्याच दिवशीचा दिनांक येथे टाकायचा आहे.
  • त्यानंतर भरलेले हमीपत्र स्कॅन करायचे आहे आणि त्याची ऑनलाईन प्रत तयार करायची आहे.
  • लडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरताना हे हमीपत्र सोबत अपलोड करायचे आहे.

Ladki Bahin Yojana Form PDF

जर तुम्हाला ऑफलाइन सुरुवात लाडकी बहिणी योजना साठी अर्ज सादर करायचा असेल तर तुम्हाला Ladki Bahin Yojana Form PDF लागणार आहे. फॉर्म ची प्रिंट आउट काढून फॉर्म मध्ये दिलेले सर्व माहिती भरून तो फॉर्म तुम्हाला सादर करावा लागतो.

लाडकी बहीण योजनेचा फॉर्म डाऊलोड करा

ऑफलाइन स्वरूपात तुम्ही तुमच्या गावातील अंगणवाडी केंद्रात किंवा ग्रामपंचायत मध्ये अर्ज सादर करू शकता. अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच आशा वर्कर यांच्याकडे ऑफलाइन स्वरूपातील अर्ज सुरू आहेत, तेथे तुम्ही हा फॉर्म देऊन योजनेसाठी अर्ज सादर करू शकता.

फॉर्म सोबत आवश्यक असे सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत, Ladki Bahin Yojana Document List खाली दिली आहे, चेक करा आणि सर्व कागदपत्रे ऑफलाईन अर्जासोबत जोडून द्या.

Ladki Bahin Yojana Document List

लाडकी बहीण योजनेसाठी हमीपत्र सोबत इतर काही आवश्यक कागदपत्रे देखील अपलोड करावे लागतात. त्याची लिस्ट मी खाली दिली आहे, लिस्ट मध्ये जे डॉक्युमेंट सांगितले आहेत ते अनिवार्य आहेत, त्यात Or मध्ये काही पर्याय आहेत पण तुम्हाला सर्व कागदपत्रे तयार करून ठेवावे लागणार आहेत.

Ladki bahin yojana साठी नवीन अपडेट नुसार कोणते Documents लागणार आहेत, याची माहिती तुम्ही खालच्या लिस्ट वरून घेऊ शकता, सोबत मी एक Image पण add केली आहे, म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे Ladki Bahin Yojana Document List पाहता येईल.

  • महिलेचे आधार कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र/ रेशनकार्ड/ मतदान कार्ड/ जन्म प्रमाणपत्र/ शाळा सोडल्याचा दाखला
  • महिलेचा जन्म दुसऱ्या राज्यात झाला असेल तर, पतीचे रेशनकार्ड/ मतदान कार्ड/ जन्म प्रमाणपत्र/ रहिवासी/ शाळा सोडल्याचा दाखला
  • पतीचे उत्पन्न प्रमाणपत्र/ रेशनकार्ड
  • महिलेचे नाव रेशनकार्ड वर नसल्यास, पतीचे रेशनकार्ड ग्राह्य/ विवाह प्रमाणपत्र
  • बँक खाते पासबुक (आधार लिंक असावा)
  • अर्जदार महिलेचे हमीपत्र
  • महिलेचा पासपोर्ट फोटो

तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही अगदी सहजपणे Ladki Bahin Yojana Hamipatra PDF Download करू शकता. स्टेप बाय स्टेप प्रोसेस सोबत डायरेक्ट लिंक पण मी आर्टिकल मध्ये provide केली आहे. या व्यतिरिक्त फॉर्म pdf, document list देखील सांगितली आहे. माहिती खूप महत्वाची आहे, त्यामुळे ज्या महिलांनी अद्याप लाडकी बहीण योजना साठी फॉर्म भरला नाहीये त्यांना ही पोस्ट शेअर करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top