Ladki Bahin Yojana Online Apply: लाडकी बहीण योजना ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, स्टेप बाय स्टेप माहिती 

Ladki Bahin Yojana Online Apply

नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आली आहे, आता अखेर Ladki Bahin Yojana Online Apply साठी Link आली आहे. सर्व पात्र महिलांना आता घरबसल्या लाडकी बहीण योजना साठी ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे.

या आर्टिकल मध्ये मी घरबसल्या Ladki Bahin Yojana Online Apply कसं करायचं? याची सविस्तर माहिती सांगणार आहे. स्टेप बाय स्टेप माहिती आहे, त्यामुळे काळजीपूर्वक हे आर्टिकल सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत वाचा.

Ladki Bahin Yojana साठी Official Website अद्याप जारी करण्यात आलेली नाही, पण योजनेसाठी Mobile App आला आहे. त्यामुळे आता तुम्हाला स्वतः देखील तुमच्या मोबाईल वरून Ladki Bahin Yojana Form Online भरता येणार आहे.

जास्त टेन्शन घेऊ नका, Majhi Ladki Bahin Yojana साठी स्वतः मोबाईल वरून अर्ज करून टाका. यामुळे तुमचे पैसे वाचतील आणि वेळ पण वाचेल, म्हणून मी या आर्टिकल मध्ये ज्या स्टेप दिल्या आहेत फक्त त्या फॉलो करा आणि Nari Shakti doot App वरून फॉर्म भरून घ्या.

Ladki Bahin Yojana Online Apply 2024 (Link)

Mazi Ladki Bahin Yojana Online Apply साठी महाराष्ट्र शासनाने Official Link सुरू केली आहे, तेथून पात्र महिलांना लाडकी बहीण योजने साठी अर्ज करता येणार आहेत. 

खाली पूर्ण स्टेप दिल्या आहेत, एकदा पूर्ण माहिती वाचून घ्या आणि अगदी त्याच स्टेप Follow करून तुमचा पण अर्ज करून टाका.

  • सुरुवातीला मोबाईलवर Play Store वरून Nari Shakti doot App Download करून घ्या.
  • त्यानंतर ॲप ओपन करून त्यामध्ये Login करून घ्या, लॉगिन करण्यासाठी खाली दिलेल्या इमेज प्रमाणे तुमचा मोबाईल नंबर टाका आणि Login वर क्लिक करा.
  • त्यानंतर मोबाईल वर आलेल्या OTP द्वारे नंबर Verify करून घ्या, मग तुमचा Profile Update करा, त्यासाठी जी माहिती विचारली आहे ती माहिती भरून घ्या.
  • एक महत्वाचं म्हणजे नारी शक्ती प्रकारात तुम्हाला सामान्य महिला हाच पर्याय निवडायचा आहे.
  • त्यानंतर प्रोफाइल अपडेट झाली की मग, मोबाईल च्या खालच्या पट्टीला नारी शक्ती दुत हा Option निवडून त्यावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुमच्या समोर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ हा Option येईल त्यावर क्लिक करायचे आहे.
  • Allow करून फॉर्म Open करायचा आहे, फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती भरून घ्यायची आहे.
  • महिलेचे/ मुलीचे नाव मात्र आधार कार्ड वर जसे आहे तसेच टाका, त्यानंतर आवश्यक अशी माहिती भरून घ्या.
  • पुढे फॉर्म मध्ये अजून एक महत्वाची बाब म्हणजे जर तुम्हाला शासनाच्या इतर कोणत्या योजने मार्फत पैसे भेटत असतील तर त्याची रक्कम तेथे टाकायची आहे, आणि रक्कम जर 1500 रू. महिना पेक्षा जास्त असेल तर थेट नाही हा ऑप्शन निवडा.
  • पुढे तुमच्या आधार नंबर ला जी बँक लिंक आहे त्या बँकेची डिटेल्स भरा. Details मध्ये फक्त बँकेचे नाव, अकाउंट नंबर, IFSC Code अशी बेसिक माहिती टाकायची आहे.
  • शेवटी डॉक्युमेंट अपलोड चा ऑप्शन येईल, त्यात तुम्हाला महिलेचे आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र आणि हमीपत्र अपलोड करायचे आहे शेवटी अर्जदार महिला किंवा मुलीची Live फोटो काढून ती पण अपलोड करायची आहे.
  • त्यानंतर जतन करा या Option वर क्लिक करून अर्ज Save करायचा आहे, सर्व अटी Accepte करायच्या आहेत. त्यानंतर तुमच्या अर्जाचा Preview येईल, त्यात तुम्ही भरलेली माहिती पाहून घ्या आणि मग फॉर्म सबमिट करा वर क्लिक करा.
  • सबमिट वर क्लिक केल्यानंतर तुम्ही सुरुवातीला जो मोबाईल नंबर दिला होता, त्या नंबरला एक OTP जाईल तो तुम्हाला टाकायचा आहे अशा प्रकारे तुमची Ladki Bahin Yojana Online Apply प्रक्रिया पार पडेल.

Ladki Bahin Yojana Form Status Check

लाडकी बहिण योजना साठी ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला Nari Shakti doot App मध्ये केलेले अर्ज या Option वर क्लिक करायचे आहे. 

तुमच्या समोर तुम्ही केलेला अर्ज Display होईल, त्यामध्ये Pending असं दाखवेल.

Ladki Bahin Yojana Form Status Check

अर्ज केल्यापासून काही दिवसाच्या आत तुमचे कागदपत्रे आणि पात्रता तपासून, जिल्हा अधिकारी कार्यालयामार्फत तुमचा अर्ज Approve केला जाईल. एकदा Ladki Bahin Yojana Form Approved झाला की मग अर्जदार महिलेला योजनेचे हप्ते मिळणे सुरू होईल.

Ladki Bahin Yojana Online Apply FAQ

लाडकी बहिण योजना साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

नारी शक्ती दुत ॲप वरून लाडकी बहीण योजना साठी अर्ज सादर करायचा आहे, लवकरच nari shakti doot ची वेबसाईट येणार आहे, तेव्हा तुम्ही तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टल द्वारे पण करू शकता.

लाडकी बहिण योजना ऑनलाईन अर्ज साठी कोणते कागदपत्रे लागत आहेत?

योजनेसाठी एकूण चार कागदपत्रे लागणार आहेत, यात अर्जदाराचे आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र आणि हमीपत्र आहे. परंतु जर तुमच्या कडे रहिवासी किंवा उत्पन्न प्रमाणपत्र नसेल तर त्याजागी तुम्ही दुसरे पण डॉक्युमेंट टाकू शकता. याची माहिती मी दुसऱ्या पोस्ट मध्ये दिली आहे.

लाडकी बहीण योजना साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?

Ladki bahin yojana online application form साठी 31 ऑगस्ट 2024 ही Last Date देण्यात आली आहे.  अर्जाची सुरुवात ही 1 जुलै रोजी झाली आहे, या आगोदर अर्जाची शेवटची तारीख 15 जुलै 2024 ठरवण्यात आली होती, पण आता या तारखेत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता तुमच्याकडे अजून 2 महिन्याची मुदत आहे.

8 thoughts on “Ladki Bahin Yojana Online Apply: लाडकी बहीण योजना ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, स्टेप बाय स्टेप माहिती ”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top